Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीयज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे शनिवारी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६७ वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. ते फुफ्फुसांशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. विनोद दुआ यांच्या पार्थिवावर उद्या लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विनोद दुआ यांनी दूरदर्शन आणि एनडीटीव्ही इंडियामध्ये दीर्घकाळ काम केले होते. तसेच प्रणय रॉय यांच्यासोबत 1984 मध्ये दूरदर्शनवर निवडणूक विश्लेषणचे अँकरिंग केले होते. तसेच द वायर आणि इतर प्रतिष्ठित मीडिया संस्थांमध्ये काम केले होते.

विनोद दुआ यांना 1996 मध्ये रामनाथ गोएंका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच, भारत सरकारने 2008 मध्ये त्यांना पत्रकारितेसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

संबंधित लेख

लोकप्रिय