चिंचवड : चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा अंतर महाविद्यालयीन खो-खो मुलींच्या स्पर्धा चिंचवड येथील श्री शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर नुकतेच संपन्न झाल्या, यासाठी कमला शिक्षण संकुलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या विशेष पुढाकाराने स्पर्धा भरविण्यात आल्या.
यात अनुक्रमे खो-खो क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक इंदापूर येथील आर्टस, सायन्स अॅण्ड कॉमर्स महाविद्यालयातील खेळाडूंनी पटकाविला.
हेही वाचा ! पुणे : किल्ले जीवधन ला लोक वर्गणीतून प्रवेशद्वार
द्वितीय क्रमांक तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयाने तर, तृतीय क्रमांक नारायणगाव येथील आर्टस कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील खेळाडूंनी पटकाविला. स्पर्धेत एकूण 9 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी संबोधित केले.
मैदानाचे पूजन एम.बी.ए.चे संचालक डॉ. सचिन बोरगावे यांनी श्रीफळ वाढवून केले. उद्घाटन समारंभ प्रसंगी पुणे जिल्हा क्रीडा समितीचे सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर चिमटे, डॉ. भरत भुजबळ, प्रा. रावसाहेब गरड, मंडळाचे अध्यक्ष सदाशिव गोडसे उपस्थित होते. प्रतिभा कॉलेजचे क्रीडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड यांनी नियोजन व सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा सत्कार व परिचय प्रा. पी.टी. इंगळे यांनी केले.
हेही वाचा ! BSNL चा खाजगी कंपन्यांना दे धक्का, स्वस्त प्लॅनमुळे ग्राहकांचा कल वाढला
स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूंचा बहुमान इंदापूर येथील महाविद्यालयाची खेळाडू हर्षदा करे उत्कृष्ट खेळ करीत मिळविला. स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडूंनी विविध महाविद्यालयातून सहभाग नोंदविला. लवकरच पुणे जिल्हास्तरिय खेळाडूंनी निवड करण्यात येईल, असे डॉ. आनंद लुंकड यांनी सांगितले.
– क्रांतिकुमार कडुलकर