पुणे : “दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती. सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.बाळासाहेब माशेरे यांचा संस्थेच्या व महाविद्यालयाच्या वतीने प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला.
महाविद्यालयीन विकास समितीच्या( C.D.C) बैठकीमध्ये संस्थेच्या / महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांचा प्राध्यापक पदी नुकतीच पदोन्नती झाल्याबद्दल बुके, श्रीफळ, आणि शाल देऊन जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष: पोपटराव देवकर, संस्थेचे सचिव सुभाषराव गारगोटे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आणि सुप्रसिद्ध उद्योगपती कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हेही वाचा ! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) विविध पदांच्या एकूण ५४७ जागा
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, डॉ. सुभाष सूर्यवंशी, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य प्रा. डॉ. ढगे, मा. प्राचार्य, डॉ. आर. एम मिसाळ, प्रा. सिद्धार्थ कांबळे, प्रा. डॉ. सोमनाथ दडस, प्रा. डॉ. स्वाती काळभोर, प्रा. डॉ. शोभा शिंदे, वंदना दळवी व इतर प्राध्यापक प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
प्राध्यापक डॉ. बाळासाहेब माशेरे हे श्रीमती. सी. के. गोयल महाविद्यालयात शिक्षण शास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम करत असून २५वर्षे पेक्षा जास्त अध्यापनाचा अनुभव झाला आहे. त्यांचे एकूण २२ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. याशिवाय नॅशनल / इंटरनॅशनल पातळी वरील सेमिनार / वर्कशॉप मध्ये विविध ठिकाणी १८ पेपर सादर केले आहेत. पीएच.डी.गाईड म्हणून काम करत आहे.
हेही वाचा ! तामिळनाडूच्या धर्तीवर रेशनदुकानात जीवनावश्यक पुरवठा करण्याची मागणी
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असून राष्ट्रीय पातळीवरील, राज्य पातळीवरील, विद्यापीठ पातळीवरील, जिल्हा पातळीवरील, व स्थानिक महाविद्यालयीन पातळीवरील अनेक शिबिरांचे संयोजन त्यांनी केले आहे.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय सेवा योजनेचा सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी आणि महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त करून दिला आहे.
सामाजिक क्षेत्रातील त्यांचे काम बहुमोल असून त्यांना आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये “अण्णाभाऊ साठे युवा गौरव पुरस्कार”, “पंडित जवाहरलाल नेहरू बाल सेवा पुरस्कार”, “सरदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय एकात्मता पुरस्कर”, “मणिरत्न पुरस्कार”, “पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार”, “पुणे शहर भूषण पुरस्कार”, “बाप्पू पुरस्कार”, “तक्षशिला गुणगौरव पुरस्कार”, “साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार”, “आयडियल टीचर अवार्ड”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोविड योद्धा पुरस्कार”, यासारखे पुरस्कार मिळाले आहेत.
प्रोफेसर पदी पदोन्नती झाल्यामुळे प्राचार्य पदासाठी लागणारी पात्रता पूर्ण केलेली असल्यामुळे भविष्यात प्राचार्य म्हणून संधी मिळाली तर सर्वोत्कृष्ट पद्धतीने काम करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवेल व चांगले काम करेल, असा प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे मनोदय व्यक्त केला आहे.