Sunday, December 22, 2024
Homeजिल्हादेहूरोड कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्यामूळे रूपीनगरच्या नागरिकांना होतोय धुराचा त्रास

देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या कचऱ्यामूळे रूपीनगरच्या नागरिकांना होतोय धुराचा त्रास

पिंपरी चिंचवड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीलगत येणाऱ्या रुपीनगर तळवडे परिसरातील कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांना त्रास होत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

देहूरोड मधील कचरा पश्चिम दिशेच्या मोकळ्या माळावर जमा केला जातो. मनपा पालिका हद्दी बाहेर असलेल्या या कचऱ्याचे नियमाप्रमाणे विल्हेवाट न लावता गेली काही वर्षे हा कचरा देहूरोड हद्दीत जाळला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 18000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

रुपीनगर येथील या कचऱ्याचा धूर आणि धोकादायक प्रदूषण रूपीनगर, सेक्टर 22 सह रहिवाशी परिसरात पसरते यावर लवकर तोडगा काढण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सातत्याने देहूरोड प्रशासन आणि आयुक्त पिंपरी चिंचवड मनपाकडे करत आहोत. परंतु हद्दीच्या वादामुळे आणि दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात ताळमेळ नसल्याने येथील नागरिक प्रदूषण मुक्त होऊ शकले नाहीत. शक्रवार 3 जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अमोल भालेकर यांनी या दुर्गंधीयुक्त धुरापासून आणि कचऱ्यापासून नागरिकांना मुक्ती द्यावी अशी मागणी करणारे निवेदन दिले.

यावेळी अजित पवार यांनी आयुक्त राजेश पाटील यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. आयुक्त राजेश पाटील यांना प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत बैठक घेण्याचे आदेश दिले. या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर यावर तोडगा काढून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 330 जागांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय