Friday, March 14, 2025

‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे’, अभिनेत्रीचं वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Photo credit : ANI twitter

सिनेसृष्टी : अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे नेहमी चर्चेत असते, यावेळी तिने दिलेल्या एका वक्तव्यामुळे ती वादात सापडली आहे. श्वेताने पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यावर कठोर भूमिका घेत हे खपवून घेतले जाणार नाही, असे सांगितले.

श्वेता तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी आदल्या दिवशी भोपाळला पोहोचली होती. श्वेता तिच्या टीमसोबत पत्रकार परिषदेत आली होती. यावेळी अभिनेत्रीने माध्यमांशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले. 

पटना हिंसा : खान सरांसह ४०० अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल

ब्रेकिंग : भाजप आमदार नितेश राणे यांना दहा दिवसांत कोर्टासमोर शरण याव लागणार

श्वेता तिवारी म्हणाली, ‘देव माझ्या ब्राचा आकार घेत आहे. त्याचवेळी तिच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी 24 तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश भोपाळचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिले आहेत.

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, श्वेता तिवारी यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. भोपाळ पोलीस आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून 24 तासांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग : माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार नाकारला !


Related Articles

- Advertisement -

Latest Articles