Thursday, February 13, 2025

अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी : आमदार महेश लांडगे

भारतरत्न वाजपेयी यांच्या स्मृतीदिनी अभिवादन

पिंपरी चिंचवड :
देशाला विकास आणि सुशासनाचा मंत्र देणाऱ्या स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे संपूर्ण जीवन हे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी आदर्शवत विचार आहे. आपल्या विचारातून लाखो नागरिकांना प्रभावित करणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते, असे मत शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय माजी पंतप्रधान श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवारी मोरवाडी येथील भाजप कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, जिल्हा सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, धमाजी नगरसेविका सुजाता पालांडे, उपाध्यक्ष नंदू दाभाडे, समीर जावळकर, गणेश ढाकणे, कैलास सानप, दिनेश यादव, योगेश सोनवणे, सचिन बंदी, मुकेश चुडासमा, कमलेश भरवाल, सतीश नागरगोजे, मंगेश धाडगे आदी सर्वजण उपस्थित होते.

यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना स्मरण करून नमन करतो. देशाला विकास आणि सुशासनाचा मंत्र देणाऱ्या अटलजींचे संपूर्ण जीवनच आदर्शवत आहे. भारताच्या विकासाच्या वाटचालीत त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे.

अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम वक्ते, विचारवंत आणि आपल्या भाषणांद्वारे लाखो नागरिकांना प्रभावित करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. भारताची आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावर भारताचे महत्व वाढण्याचे महत्वपूर्ण कार्य वाजपेयी यांच्या दूरदर्शी नेत्तृत्वात झाले.

– क्रांतिकुमार कडुलकर

Related Articles

- Advertisement -

Latest Articles