Thursday, February 6, 2025

आंबेगावच्या 400 श्रमिकांची ई-श्रम कार्डसाठी नोंदणी – किसान सभेचा पुढाकार

आंबेगाव : केंद्र सरकारच्या,श्रम व रोजगार मंत्रालय यांच्या वतीने देशभरातील असंघटित कामगारांची नोंद करण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे. सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील सुमारे 400 श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने, आंबेगाव तालुक्यातील सुमारे 400 असंघटित कामगार व रोजगार हमीवर काम करणाऱ्या श्रमिकांचे, ई-श्रमकार्ड तयार करण्यात आले आहे. या ई-श्रम कार्डाचे प्रातिनिधिक वितरण कार्यक्रम, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घोडेगाव येथे पार पडला. 

हिरडा कारखान्यासाठी काळू शेळकंदे यांचे उपोषण सुरू, प्रशासनाची चर्चा असफल

यावेळी घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या हस्ते प्रातिनिधिक 10 श्रमिक महिला-पुरुष यांना हे ई-श्रम कार्ड वितरित करण्यात आले. कोविडमुळे हा कार्यक्रम अत्यंत मर्यादित स्वरूपात घेण्यात आला.

श्रमिकांना, हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी लहू थाटे यांनी केले. किसान सभेच्या पुढाकाराने व अभिनव सेवा केंद्र आणि एकता कॉम्प्युटर यांच्या तांत्रिक सहकार्याने सुमारे 400 श्रमिकांची नोंदणी करण्यात आली आहे.

जुन्नर : गणपत घोडे यांची तालुकास्तरीय रोजगार हमी योजनेच्या सदस्यपदी निवड !

या कार्यक्रमाला जिंदा सांडभोर, किरण लोहकरे, किसान सभेचे डॉ.अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, अशोक जोशी, संदीप केवाळे, अर्जुन काळे, अनिल सुपे एस.एफ.आय.संघटनेचे अविनाश गवारी, बाळकृष्ण गवारी, राहुल कारंडे, इ.उपस्थित होते.

देशात असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. यात स्थलांतरीत होणाऱ्या  कामगारांचा मोठा समावेश आहे. अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही सुविधा देण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील काही सेवा देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकारकडून सुरू आहे. सद्यस्थितीत या कामगारांना या, ई-श्रम कार्डमुळे विमा कवच प्राप्त होत आहे.

पदोन्नतीमधील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

Related Articles

- Advertisement -

Latest Articles