Wednesday, February 5, 2025

राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी मिलिंद तोतरे सेवानिवृत्त

टाटा मोटर्सचे माजी कर्मचारी, हुतात्मा राजगुरु महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी

नागपूर : येथील लोकप्रिय कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मिलिंद तोतरे 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवे नंतर आज सेवानिवृत्त झाले. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक,  भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागात त्यांनी कर्तव्य निभावले.

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बाभळी हे त्यांचे मूळ गाव, बडनेरा येथून नगर पालिकेच्या छोट्याश्या शाळेतून त्यांनी शिक्षण घेऊन नांदगाव, जिल्हा नासिक येथून 10 वीचे शिक्षण पूर्ण केले. सामान्य कुटुंबातील  मिलिंद तोतरे यांनी 1980 च्या तुकडीत टाटा मोटर्सच्या (टेल्को, पिंपरी) प्रशिक्षण विभागात शिकाऊ कामगार म्हणून रुजू झाले. प्रशिक्षण काळात त्यांनी राजगुरूनगर, खेड येथून वाणिज्य विषयात पदवी घेतली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!

जून 1989 मध्ये टाटा मोटर्सची नोकरी सोडून ते महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगा मार्फत जून 1989 मध्ये  पोलीस उप निरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले. ही नोकरी करत असताना सन 2010 मध्ये कायद्याची आणि 2013 मध्ये  बिझिनेस मॅनेजमेंटची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

जून 1990 ते ऑगस्ट 1992 चे दरम्यान सोनेगाव पोलीस स्टेशन नागपूर, ऑगस्ट 1992 ते ऑगस्ट 1993 चे दरम्यान राणाप्रताप नगर पोलीस स्टेशन नागपूर, ऑगस्ट 1993 ते मार्च 2000 चे दरम्यान केंद्रिय गुप्तचर विभाग नागपर, एप्रिल 2000 ते जानेवारी 2001या काळात इमीग्रेशन ब्यूरो अमृतसर (आत्तारी सीमा), फेब्रुवारी 2001 ते डिसेबर 2004 या कालावधीत आर्थिक गुन्हे प्रतिबंधक शाखा नागपूर, त्यानंतर जानेवारी 2005 ते मे 2010 दरम्यान भ्रष्टlचार प्रतिबंधक विभाग नागपूर व गोंदिया, जून 2010 ते मे 2014 या काळात दहशतवाद विरोधी पथक,

केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले

कोरोनाचे निर्बंध हटविण्यास सुरूवात, राज्य सरकारने केली नवीन नियमावली जाहीर

नागपूर आणि पुन्हा जून 2014 पासून सेवानिवृत्ती पर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे कामगिरी बजावली. त्यांनी केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून भारत सरकारने त्यांना 26 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. नागपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक (ACB) या पदावरून 32.8 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर ते दि. 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.

ते म्हणाले की,1980 च्या दशकातील विद्यार्थाना उमेदीच्या काळात अतिशय कठोर परिश्रम करावे लागत होते. आजसारख्या शैक्षणीक सुविधा संचार साधने आमच्या पिढीकडे नव्हती. आर्थिक अडचणीतुन मार्ग काढत आम्ही टाटा कंपनीत यंत्र तंत्राचे प्रशिक्षण घेतले. तिथे वसतिगृह, मोफत जेवण आणि विद्यावेतन मिळायचे. 

ब्रेकिंग : देशाचे अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पाने जनतेला काय दिले वाचा एका क्लिकवर !

पुणे विद्येचे माहेरघर .. त्यामुळे इथे उर्वरित वेळेत पदवी मिळवण्यासाठी हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, खेड येथे कंपनीची 10 तास नोकरी व 2 तासाचा रोजचा प्रवास करून शिक्षण घेतले. पोलीस अधिकारी व्हायचे हे स्वप्न मनाशी बाळगून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या 41 वर्षाच्या या प्रवासात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. अनेकांनी मार्गर्शन, प्रेरणा दिली. 

सेवेतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रेम व मार्गदर्शन यामुळे मी आज निवृत्त होताना सर्वांचा ऋणी आहे. सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमास राकेश ओला, पोलीस अधीक्षक, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी मिलिंद तोतरे यांना शुभेच्छा देऊन सत्कार केला.

– क्रांतिकुमार कडुलकर


Related Articles

- Advertisement -

Latest Articles