जुन्नर : आपल्या घरातील, समाजातील किंवा परिसरातील ज्येष्ठांची काळजी घेणे, त्यांचा योग्य सन्मान राखणे हीच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन पार्श्वशांती महिला मंडळाच्या अध्यक्षा राखी शाह यांनी केले. मंडळाने आयोजित मातृपितृ वंदना कार्यक्रमात त्या बोलत होते.
पुढे बोलताना शहा म्हणाल्या की, प्रत्येक घरातील तरुण पिढीने घरातील वृद्धांची योग्य काळजी घेतल्यास समाजात वाढत चाललेली वृद्धाश्रम संस्कृती थांबविणे शक्य होईल. याप्रसंगी समाजातील ४८ ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार व सन्मान करून त्यांना गौरविण्यात आले.
जुन्नर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दामोदर जगदाळे
दरम्यान महिला मंडळाच्या वतीने याप्रसंगी कौटुंबीक संदेश देणारी विविध नाट्ये, गीते वाद्यवृंदासह सादर करण्यात आली. याप्रसंगी कुसुम गांधी, पद्मा शहा, नमिता शहा, सुनंदा शहा, विजय नानावटी, राकेश शहा तसेच माजी उपनगराध्यक्षा अलका फुलपगार, भाजप महिला शहराध्यक्षा डॉ. राजश्री इंगवले, माजी नगरसेविका ज्योती लुणावत आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पल्लवी शहा, धनश्री नानावटी, शर्मिला नानावटी, जयश्री शाह, ज्योती नानावटी, भाविका शहा, ज्योती शहा तसेच महिला मंडळाने नाट्य तसेच गाण्यांचे सादरीकरण केले.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
या कार्यक्रमासाठी श्वेता शहा, जया शहा, प्रिया शहा, स्नेहा शहा तसेच केतन नानावटी, कीर्ती शहा, सुशील नानावटी, नितीन शाह, मुकेश शहा, मेहुल गांधी, तीर्थेश शाह आदींनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमादरम्यान कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात आल्याची माहिती रणजित शहा यांनी दिली.