वुई टूगेदर संस्थेतर्फे मावळमध्ये किराणा वितरण
मावळ : पिंपरी चिंचवड मधील वुई टूगेदर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने सावळा,कुसवली ता.मावळ येथील आदिवासी कुटुंबाना किराणा वितरण केले.
येथील आदिवासी कार्यकर्ते चंद्रशेखर खांडभोर, शांताराम हिलम, सरपंच नामदेव घोंटे, भाविन भंडारी, मेघना बेरी यांनी आदिवासीचे सक्षमीकरणासाठी शहरातील नागरिकांच्या या संस्थेमार्फत कार्यक्रम आयोजित केला होता.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षे साजरे करत असताना आजही आदिवासी समाज अतिदुर्गम भागात गरिबीचे जिणे जगत आहे. भूक, कुपोषण, अनारोग्य यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही. डोंगराळ प्रदेशात त्यांना सेवा पुरवण्यासाठी मनुष्यबळ आणि पैशाची कमतरता असते. शहरातील संपन्न, समृद्ध दानशूर नागरिकांच्या योगदानातुन अन्नधान्य, खाद्यतेल, पौष्टिक डाळी इ जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणातून या कुटुंबाना सात्विक अन्न देता येईल.
दुर्गम भागातील शासकीय आरोग्य सेवा, आरोग्य सेवक आणि शहरातील सेवाभावी डॉक्टर्स, समृद्ध वर्गातील दानशूर लोक एकत्र येऊन आदिवासीच्या कल्याणकारी योजना सफल होतील, असा विश्वास पुणे जन आरोग्य मंचाचे डॉ.किशोर खिल्लारे यांनी सावळा येथील भैरवनाथ मंदिरातील कार्यक्रमात व्यक्त केला.
ऑस्कर विजेते रेसुल पुकुट्टी यांचा मोठा भाऊ आणि 17 एलजेडी नेत्यांचा कम्युनिस्ट पक्षात प्रवेश
किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ८ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल, शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार?
वुई टूगेदर फौंडेशन ही संस्था पुणे, पिंपरी चिंचवड डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, विद्यार्थी, युवक, श्रमिक, कामगार, महिला संघटनातील कार्यकर्ते, जेष्ठ निवृत्त नागरीक यांनी स्थापन केलेली आहे.
संस्थेचे अध्यक्ष सलीम सय्यद यावेळी म्हणाले की, आदिवासी समाज अजून गरीबीचे जीणं जगत आहे. त्यांच्या मुलां मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी शहरातील दानशूर लोक मदत द्यायला तयार असतात. त्यांची मदत गरजुना त्यांच्याच हस्ते आम्ही वितरित करत असतो. आमच्या कामातील पारदर्शकता आणि उपेक्षितांचे अंतरंग वास्तव त्यांना कळते, त्यामुळे मदतीचे हात सतत पुढे येतात.
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
रंगीत बटाट्याचे नवे वाण विकसित, रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, बघा काय आहे खासियत
आढारवाडी सावळा येथील महादेव कोळी आणि कुसवली येथील कातकरी आदिवासी कुटुंबाना सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव कुलकर्णी, रविंद्र बो-हाडे, दत्तात्रय सातव, दारासिंग मन्हास, वरिष्ठ अधिकारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्रीनिवास जोशी, उल्हास दाते, एम. के. शेख, सदाशिव गुरव, विलास गटणे, क्षितिज गुजराती यांच्या हस्ते किराणा किट वितरित करण्यात आले.
कुसवली येथे तारामती बो-हाडे, संध्या सातव, स्मिता रिंगे, सोनाली शिंदे, शेहनाज शेख, शिवानी सातव, अपूर्वा जाधव, सोनाली मन्हास, ऋतुजा बो-हाडे, सोनाली शिंदे, स्मिता जाधव, सृष्टी सातव, सबा सय्यद, कुणाल गायकवाड, भाविन भंडारी यांचे हस्ते किराणा किट वितरित करण्यात आली.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
या दोन्ही गावातील कार्यक्रमाचे प्रास्तविक मेघना बेरी यांनी केले. सूत्र संचालन सोनाली मन्हास, स्मिता जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन शेहनाज शेख, स्वप्निल जेवळे, सोनाली शिंदे, यांनी केले.
– क्रांतिकुमार कडुलकर