पुणे, दि. ९ : पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात आज (बुधवार, दि.09) सकाळी वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागात साधारणतः पाच तासाने तर अनेक भागांत तब्बल दहा तासानंतर वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे.
वीज पुरवठा खंडीत झाल्याचे कारण आता समोर आले आहे, दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओ : प्रपोज डे ला विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये तुफान राडा, आडव तिडवं पाडून एकमेकांना कुदवलं
दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रूग्णालये, पाणीपुरवठा, ऑक्सीजन प्रकल्प, रेल्वेसेवा, विमानसेवा या क्षेत्रात मात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवला.
तळेगाव-लोणीकंद-चाकण या परिसरात दाट धुक्यामुळे वीजवाहिन्या बंद पडल्या. त्यानंतर स्वयंचलित ऍटो रिक्लोजर वाहिन्या सुरू होण्याच्या प्रयत्नात वेगवेगळ्या ठिकाणी वाहिन्या बंद झाल्या. यामुळे ४०० के. व्ही. चाकणचा विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच लोणीकंद-१ व लोणीकंद-२ निगडित तीन ४०० के. व्ही. वाहिन्या बंद पडल्यामुळे तसेच उर्वरित ४०० के. व्ही. वाहिन्यांवर लोड वाढल्यामुळे वेळेत लोड नियंत्रित करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पुणे शहर, चाकण, बारामती, सुपा, आळेफाटा या परिसरात भारनियमन करण्यात आले. दुपारपर्यंत सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत करण्यात आला.
बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी ! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ११४९ जागांसाठी भरती
घटनाक्रम :
१) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण लाईन पहाटे ३.३९ ला बंद पडली.
२) ४०० के. व्ही. चाकण-लोणीकंद लाईन पहाटे ४.३१ ला बंद पडली.
३) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ लाईन पहाटे ५.५२ ला बंद पडली.
४) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ लाईन पहाटे ५.२४ ला बंद पडली.
५) ४०० के. व्ही. लोणीकंद-कराड लाईन सकाळी ६.०२ ला बंद पडली.
६) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण दुपारी १२.०४ मिनिटांनी सुरू करण्यात आली.
७) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ दुपारी २.५७ सुरू करण्यात आली.
८) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ दुपारी ३.४२ ला सुरू करण्यात आली.
९) उर्वरित ३ वाहिन्या संध्याकाळी पाच वाजेपर्यत पूर्ववत करण्यात आल्या.
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध अधिकारी पदांच्या ५०० जागांसाठी भरती
प्रत्येक जोडप्याने सकाळी उठल्याबरोबर या चार गोष्टी करा; प्रेम होणार नाही कधीच कमी