पुणे / आनंद कांबळे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाची नवीन तारीख घोषित करण्यात आली असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (बुधवार) विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी म्हणजे (३ जानेवारी) रोजी पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमाला वेळ न देऊ शकल्याने राज्यपालांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नसल्याची चर्चाही होती. यावरून मोठा वाद देखील झाला होता. आता सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यादचे १४ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेऊन विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
विशेष लेख : भारत स्वस्त मजुरांची अस्वस्थ बाजारपेठ
या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक असा कार्यक्रम होणार असल्याने नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या बैठकीला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच अधिसभा सदस्य आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
10 वी पास सुवर्णसंधीचा लाभ घ्या !ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये जागांसाठी भरती, आजच अर्ज करा!