Friday, May 3, 2024
Homeराजकारणएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतू शिवसेनेने दिला मोठा दणका

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतू शिवसेनेने दिला मोठा दणका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड करून भाजप सोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. पक्षाने शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. शिंदे यांच्या सोबत शिवसेनेचे ३९ आमदार असल्याने शिंदे गटानं पक्षावरच दावा सांगितला आहे. अशात आता पक्षाने ही कारवाई केली आहे.

गुरूवारी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का दिला. या घोषणे नंतर काही तासातच शिंदे आणि फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतू सरकार म्हणून अनेक तांत्रिक पेच कायम असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याने शिंदे यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

शिंदे गटानं शिवसेनेचे ५५ पैकी ३९ आमदार आपल्यासोबत असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे विधिमंडळातील खरी शिवसेना कोणती असा प्रश्न शिंदेंच्या दाव्यानं निर्माण झाला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या घटनेत “शिवसेना प्रमुख” हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना पक्षप्रमुखांनाच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रमुख या अधिकारात अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे या चार जणांची पक्षनेते म्हणून नियुक्ती केली होती. या चार जणांची नियुक्ती रद्द करण्याचे अधिकार देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. आता पक्षविरोधी केल्याने शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय