Tuesday, April 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आप ची नागपूर च्या जनतेला दुसरी गॉरंटी – शिक्षण सल्लागार सुश्री आतिशी यांची घोषणा 

नागपूरात आप बनवणार 156 वर्ल्ड क्लास शाळा

---Advertisement---

नागपूर : आम आदमी पार्टी येणारी महानगरपालिका निवडणूक जनतेला दिल्ली मॉडेल देण्याकरिता स्वबळावर सर्व जागा लढविणार आहे. आम आदमी पार्टी कडून दि.१८ जून ला नागपूर च्या जनतेला पहिली गॉरंटी १५००० लिटर शुद्ध पाणी मोफत देण्याची दिली आहे. आज आम्ही दुसरी गॉरंटी – दर्जेदार शिक्षणाची देत आहोत, अशी घोषणा दिल्ली सरकार च्या शिक्षण सल्लागार सुश्री आतिशी यांनी घोषणा केली.

दिल्ली मध्ये शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टी च्या सरकार कडून अमुलाग्र बदल करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. शिक्षणाचे बजेट २२ टक्के करून सरकारी शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या दर्जेदार बनविल्यात. त्यामुळे मागच्या वर्षी चार लक्ष विद्यारर्थ्यांनी खाजगी शाळेतून नावे काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. दिल्लीच्या शाळांचे निकाल सर्वात चांगले यायला लागलेत. सरकारी शाळेमधील विद्यार्थी IIT, AIIMS मध्ये प्रवेश घायला लागलेत. आम्ही हेच दिल्ली मॉडेल नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपुरतात आणण्याची तयारी करीत आहोत, असेही आतिशी म्हणाल्या.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles