Thursday, February 6, 2025

अखेर आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची घेण्यात आलेली पदभरती परिक्षा रद्द

पुणे : पेपरफुटीमुळे वादग्रस्त ठरलेल्या आरोग्य विभागाची गट ‘क’ व गट ‘ड’ची घेण्यात आलेली पदभरती परिक्षा रद्द केली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या अवर सचिव अर्चना वालझाडे यांनी जाहीर केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गट क व गट ड संवर्गांच्या दि. २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या दोन्ही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणी आरोग्य विभागाने पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हापासून ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती. अखेर राज्य शासनाने आरोग्य विभागाची गट क व ड ची २४ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात आलेली पदभरती परिक्षा रद्द केली आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाच्या अवर सचिव अर्चना वालझाडे यांनी बुधवारी जाहीर केला आहे.

नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी यापूर्वीच्या परीक्षा दिलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांना नवीन परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियमित शुल्क भरावे लागणार आहे. असे जाहिरातीमध्ये नमूद केले आहे. तसेच वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठीही वयाची अट शिथिल करण्यात आली आहे. असे परीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles