दिघी : माॅविक सायकल क्लबच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख शिवस्मारक भोसरी, दापोडी, फुगेवाडी, पिंपरी, निगडी आदी ठिकाणी सायकल रॅलीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायानां मानवंदना देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पर्यावरण रक्षक व संवर्धन जनजागृतीचा संदेश झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा, पाणी जिरवा, प्रदुषण टाळा, पर्यावरण वाचवा, कचरा मुक्त शहर, स्वच्छ शहर संपूर्ण शहरात पोहचावा या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी सायकलपटू दत्ता घुले, मयूर पिंगळे, प्रतिक जेले, देवेंद्र सावंत, सतिश मस्ते, चेतन भुजबळ, सुनिल पाटोळे हे सहभागी होते.
आकुर्डी : दत्तवाडी येथे माकपच्या वतीने शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय सुरू
पिंपरी चिंचवड : होकर्स युनियन चे महानगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार
पिंपरी चिंचवड : असंघटित कामगार काँग्रेस तर्फे शिवजयंती साजरी !