Monday, July 15, 2024
Homeआंतरराष्ट्रीयसावधान ! युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो - ज्यो बायडेन

सावधान ! युक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो – ज्यो बायडेन

वॉशिंग्टन : युक्रेनवर आक्रमण करण्याच्या तयारीत रशिया आहे. पुढील आठवड्यात रशियाच्या फौजा कीवसह युक्रेनवर हल्ला (Attack On Ukraine) करतील, हे ठामपणे सांगू शकतो आणि त्यामागे कारणही आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी शुक्रवारी केला. 

“विद्यार्थी आपले भविष्य आहेत त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करा” जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

युक्रेनवरील हल्ल्याची योजना रशियाने (Russia) प्रत्यक्षात आणली तर हा युद्धाचा विनाशकारी व अनावश्‍यक निर्णय त्यांना जबाबदार धरले जाईल. आक्रमण झाल्यास रशियावर कडक निर्बंध लादण्याची आमची तयारी आहे, असा इशारा बायडेन यांनी दिला. 

हिजाब काढण्यास नकार देणाऱ्या ५८ विद्यार्थिनी निलंबित

रशियाच्या तयारीची पक्की माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे, असे बायडेन यांनी सहकारी देशांच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर सांगितले. रशिया- युक्रेन संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर बायडेन यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय