Sunday, December 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीयरशियाकडून युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर, किती घातक आहे हा बॉम्ब ? वाचा...

रशियाकडून युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्बचा वापर, किती घातक आहे हा बॉम्ब ? वाचा !

 

किव : व्हॅक्यूम बॉम ची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो ऑक्सिजन शोषून घेऊन मोठा स्फोट निर्माण करतो आणि या स्फोटामुळे अल्ट्रासोनिक शॉक व्हेव तयार होतात आणि त्या बाहेर पडतात. त्यामुळे अधिकच विनाश घडवून आणला जातो. संपूर्ण जगात अशा शस्त्रांना अधिक भयानक मानलं गेलं आहे.

रशिया आणि युक्रेन हल्ल्याचा आजचा पाचवा दिवस आहे. आतापर्यंत रशियाकडून युक्रेन यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. तिथल्या लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. युद्धातील हल्ल्यापासून वाचण्यासाठी त्यांनी तळ घराचा आसरा घेतला आहे.  त्यांच्याजवळील अन्नसाठा संपत आला आहे. जवळच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्यासाठी सुद्धा त्यांना परवानगी नाही. शहरात कर्फ्यू लागला आहे.

थर्मोब्यारीक बॉम्ब अशी तुलना जगामध्ये सर्वात घातक शस्त्र म्हणून केली जाते. 2007 साली हा बॉम्ब तयार झाला. त्याचे वजन 7100 किलो असते. इमारती व लोकांना मारण्यासाठी याचा वापर केला जातो. हा एकदम खतरनाक बॉम्ब असून 44 टनाची ताकद असणारा जगातील एकमेव बॉम्ब आहे.

रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !

संबंधित लेख

लोकप्रिय