Thursday, July 18, 2024
Homeजिल्हावन हक्क धारकांचा ७/१२ उताऱ्यासाठी पायी मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर !

वन हक्क धारकांचा ७/१२ उताऱ्यासाठी पायी मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर !

धुळे : किसान सभे ( AIKS ) च्या नेतृत्वाखाली 75 किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली होती. शिरपूर तालुक्यातील किसान सभा 1987 पासून वनजमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लढा देत आहे. वनजमीन प्रमाणपत्राच्या मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

किसान सभा व बिरसा फायटर्स तर्फे २२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळेस शिरपुर तालुक्यातील वनजमिन असणारे आदिवासी मोठ्या संख्येने सामिल झाले. महिला शेतकऱ्याचा देखील सहभाग होता. या वेळेस धुळे शहरात लाल झेडें हातात घेऊन मोर्चाकऱ्यांनी घोषणा देऊन शहर दणाणून टाकले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर त्याठिकाणी सभेत रुपांतर झाले. अनेक संघटनांनी मोर्चास पाठींबा दिला.

रशिया आणि युक्रेन युध्द : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली भूमिका जाहीर

जिल्हाधिकारी यांना प्रा.राजु देसले, अँड मदन परदेशी, अँड हिरालाल परदेशी, अँड .संतोष पाटील, विलास पावरा, डॉ.किशोर सुर्यवंशी, शिलदार पावरा, जितेन्दर देवरे, वसंत पाटील, गेद्धा पावरा, निलेश सुर्यवंशी, पोपट चौधरी, यांनी जिल्हाधिकारी यांना वरील २२ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

यावेळेस जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक मागणी वर सविस्तर चर्चा करुन वनविभागाने १/२/२०१९ जी.आर प्रमाणे वन हक्क प्रमाण पत्रकधारकांना जे फार्म भरून त्वरीत ७/१२ चा अधिकार देण्याचे वचन विभाग, महसुल, कृषी, विज विभाग यांना आदेश दिले आहेत.

दहावी, बारावी पास विद्यार्थ्यासाठी नोकरीची चांगली संधी : IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये 1095 जागांची भरती !

महाराष्ट्रातील सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय