Sunday, December 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीययुरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला, जगभरात चिंता !

युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला, जगभरात चिंता !

किव : रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नववा दिवस आहे. आता पर्यंत दोन्ही देशात दोन वेळा चर्चा झाल्या आहे. मात्र, निष्फळ ठरल्या आहे. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती बिकट होत चालली असून, युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. 

जगाला ज्याची भिती होती ते घडताना दिसत आहे. युरोपातील सर्वात मोठी अणुभट्टी असलेल्या झापोरिझिया ओब्लास्ट येथे रशियाकडून चारही बाजूंनी हल्ले केले जात असून, हल्ल्यांमुळे अणुभट्टीच्या जवळ आग लागल्याचं समोर आलं आहे.

या हल्ल्यात झापोरिझिया न्युक्लिअर पावर प्लांटवर आगीचा भडका उडालेला असून, त्यामुळे रेडिएशनची लेवल वाढल्याचाही दावा करण्यात आलाय. जर स्फोट झाला, तर चर्नोबिलच्या तुलनेत १० पट अधिक तीव्रतेचा असेल, यामुळे कोट्यवधींचीही मनुष्यहानीही होऊ शकते. रशियाने तत्काळ हल्ले थांबवावेत. अग्निशमन दलाचे जवानांना तिथे जाऊ द्या,’ असं कुलेबा यांनी म्हटलं आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख सल्लागारांनी आग याबद्दलचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय