Wednesday, April 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

मोठी बातमी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ला, २६ पर्यटकांचा मृत्यू

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे, ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बैसरन खोऱ्यात मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला गेल्या सहा वर्षांतील काश्मीर खोऱ्यातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

---Advertisement---

या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन विदेशी पर्यटक, महाराष्ट्रातील पाच नागरिक (डोंबिवलीतील तिघे आणि पनवेलमधील एक), आणि इतर राज्यांतील पर्यटकांचा समावेश आहे.  (हेही वाचा – महाराष्ट्रातील एका शेतकऱ्याला एका झाडाने रात्रीतून केले करोडपती)

हल्लेखोरांनी लष्कर किंवा पोलिसांचा गणवेश परिधान केला होता, ज्यामुळे पर्यटकांना त्यांचा संशय आला नाही. बैसरन खोऱ्यात घोडेस्वारी आणि पिकनिकसाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे आणि धर्म विचारून गोळीबार केला. एका प्रत्यक्षदर्शी महिलेच्या म्हणण्यानुसार, “दहशतवाद्यांनी पुरुषांना विशेषतः लक्ष्य केले आणि त्यांचा धर्म विचारला. जे मुस्लिम नव्हते, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.” या हल्ल्यात एका पर्यटकाच्या मुलीसमोर तिच्या वडिलांना तीन गोळ्या मारण्यात आल्या.  (हेही वाचा – ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन : भारतात 3 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर)

---Advertisement---

दहशतवादी संघटना आणि जबाबदारी | Pahalgam Terrorist Attack

‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबाची उपशाखा मानली जाते आणि ती गैर-कश्मीरी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांनी रेकी केल्याचे संकेत मिळाले आहेत.  (हेही वाचा – मोठी बातमी : सोन्याचा दर 1 लाखांवर ; वाचा पुणे, मुंबई मधील सोन्याचे दर)

सरकार आणि सुरक्षा यंत्रणांची प्रतिक्रिया

हल्ल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी बैसरन परिसरात शोधमोहीम सुरू केली. सीआरपीएफच्या क्विक रिएक्शन टीमला घटनास्थळी पाठवण्यात आले. मात्र, बैसरन हा वाहनांना जाण्यासाठी अरुंद आणि खड्ड्यांनी भरलेला परिसर असल्याने बचावकार्यात अडथळे आले. याशिवाय, जम्मू-काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनामुळे रस्त्यांची अवस्था खराब आहे, ज्यामुळे सुरक्षा दलांना आव्हानांचा सामना करावा लागला. (हेही वाचा – निवडणूकीतील घोटाळा ते वाल्मीक कराडच्या एनकाऊंटर पर्यंतचे आरोप करणारे निलंबित पोलीस अधिकारी पोलिसांच्या ताब्यात)

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते, यांनी हल्ल्याची माहिती मिळताच आपला दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले. त्यांनी सोशल मीडियावर हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत म्हटले, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना न्याय मिळवून दिला जाईल. दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल. (हेही वाचा – मोठी बातमी : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अंतिम निकाल जाहीर, शक्ति दुबे देशात पहिली)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles