मुंबई : नुकतीच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांची वाढ झाल्यानंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे. (CNG Price) महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने मंगळवारी, ८ एप्रिल २०२५ रोजी सीएनजीच्या किंमतीत १.५० रुपये प्रति किलोग्रॅम आणि पाइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या किंमतीत १ रुपये प्रति स्टँडर्ड क्युबिक मीटर (एससीएम) वाढ करण्याची घोषणा केली. हे नवे दर मंगळवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच ८ एप्रिल २०२५ पासून लागू झाले आहेत. (हेही वाचा – मोठी बातमी : मनसे पक्षाची मान्यता रद्द होणार ? राज ठाकरे विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका)
नव्या किंमतींचा तपशील | CNG Price
या वाढीनंतर मुंबईत सीएनजीची किंमत ७८ रुपये प्रति किलोग्रॅमवरून ७९.५० रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर पीएनजीची किंमत ४८ रुपये प्रति एससीएमवरून ४९ रुपये प्रति एससीएम इतकी झाली आहे. ही वाढ मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात लागू झाली असून, याचा थेट परिणाम वाहनचालकांवर होणार आहे. (हेही वाचा – महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील दृश्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप)
यापूर्वीच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत झालेल्या ५० रुपयांच्या वाढीमुळे १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजी नंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)