Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Alandi :पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटीफिकेशन काढणार – मुख्यमंत्री फडणवीस

पत्रकार सन्मान योजनेच्या अटी शिथिल करणार मुख्यमंत्र्याची ग्वाही (Alandi)

पत्रकारांच्या दहा संघटनांच्या मंचला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन


आळंदी (अर्जुन मेदनकर ) : पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकर काढण्यात येईल… पत्रकार सन्मान योजनेच्या अटी देखील शिथिल करण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (Alandi)

पत्रकारांच्या दहा संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्या वतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली. यावेळी जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भातील आक्षेप आणि शंकाच्या संदर्भात सह्याद्रीवर बैठक घेण्यात आली. बैठकीस गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीच्या अखेरीस मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याचा मुद्दा उपस्थित केला. पत्रकार संरक्षण कायदा झाला पण कायद्याचं नोटिफिकेशन निघाले नसल्याने राज्यात कायदा अंमलात आलेला नाही ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेच नोटिफिकेशन काढण्याची सूचना गृहसचिवांना केली. पत्रकार सन्मान योजनेचे नियम अत्यंत जाचक असल्याने बहुसंख्य ज्येष्ठ पत्रकार या योजने पासून वंचित आहेत. तेव्हा नियम शिथिल करण्याची मागणी एस.एम.देशमुख यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधीच्या सूचना संबंधीत विभागातील अधिका-यांना दिल्या.

पत्रकारांच्या दहा संघटनांच्या मंचचे तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मार्गदर्शम एस.एम. देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीस आश्वासन देऊन संबंधित अधिकारी, विभाग प्रमुख यांना सूचनादेश देत ग्वाही दिल्या बद्दल हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे वतीने अध्यक्ष अर्जुन मेदनकर, उपाध्यक्ष सोमनाथ बंडाले, जिल्हा प्रतिनिधी राजेश नागरे, अमर गायकवाड आदी पदाधिकारी यांनी सर्वांचे अभिनंदन करून निर्णयाचे स्वागत केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles