Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नरजवळ दुर्दैवी अपघातात एकाचा मृत्यू, तिघे जखमी

जुन्नर, (रफिक शेख) : जुन्नर (Junnar) तालुक्यातील बादशाह तलावाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद जुन्नर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे BNS 2023 चे कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार करण्यात आली आहे.

---Advertisement---

फिर्यादी सईदखान हुसेनखान इनामदार (वय ४०, रा. चंदीपूरापेठ, जुन्नर) यांच्या फिर्यादीनुसार, दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ते आपल्या जुपिटर दुचाकीवरून आपल्या दोन मुलांसह प्रवास करत होते. (Junnar) बादशाह तलावाजवळील HP गॅस गोडाऊनजवळ पोहोचताच त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या MH 14 EB 0637 क्रमांकाच्या मोटारसायकलने धडक दिली.  (हेही वाचा – मला प्रेमात अडकवून लग्न करण्यासाठी 20 कोटींची सुपारी)

सदर मोटारसायकल चालवणारा कैलास राजाराम जगताप (रा. औटीमळा, नारायणगाव) हा दुचाकी भरधाव चालवत होता. धडकेनंतर कैलास झाडावर जाऊन आदळला आणि गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातात सईदखान इनामदार यांच्या उजव्या हात व पायास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या दोन्ही मुलांनाही डोके व हातपायास मार लागला आहे. (हेही वाचा – घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांना झटका)

---Advertisement---

सदर अपघाताची नोंद जुन्नर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बंडगर करत आहेत. प्रकरणाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक धिरबस्सी मॅडम आहेत. (हेही वाचा – धक्कादायक : टार्गेट पूर्ण न केल्याने कामगारांना कुत्रा बनवले, प्रायव्हेट पार्टला स्पर्श व्हिडिओ व्हायरल)

Related Articles

- Advertisement -

Latest Articles