Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : नांदेडमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून ८ महिला मजुरांचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात एक हृदयद्रावक अपघात घडला. हळद काढण्यासाठी शेतात जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळला. (Nanded accident) या दुर्घटनेत ८ महिला मजुरांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

---Advertisement---

अपघात कसा घडला? | Nanded accident

हा अपघात नांदेड जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आलेगाव शिवारात सकाळी ७ ते ७.३० या दरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महिला मजूर वसमत तालुक्यातील गुंज गावातील रहिवासी होत्या. त्या हळद काढण्याच्या कामासाठी शेतात जात होत्या. सध्या या भागात पाऊस सुरु आहे. यामुळे ट्रॅक्टरचे टायर स्लीप झाल्याने ही घटना घडली. आणि ट्रॅक्टर थेट शेताजवळील एका खोल विहिरीत कोसळला. विहिरीत पाणी असल्याने अनेक महिला पाण्यात बुडाल्या, तर काहींना गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा – लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती)

या अपघातात आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, तर काहींना ट्रॅक्टरखाली दबल्याने गंभीर जखमा झाल्या. त्यातील दोन महिलांना वाचवण्यात आम्हाला यश आलं. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि पोलिसांना पाचारण केले. नांदेड पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा – अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क आकारणार)

---Advertisement---

या महिलांचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून होता. रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. (हेही वाचा –धक्कादायक : नवरदेव पसंत नव्हता, नवरीनेच दिली हत्येची सुपारी)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles