Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

माजी सेबी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

Madhavi Puri Buch : मुंबईतील एका विशेष न्यायालयाने माजी सेबी (भारतीय प्रतिभूति आणि विनिमय बोर्ड) अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच जणांविरुद्ध कथित शेअर बाजार फसवणूक आणि नियामक उल्लंघनांच्या आरोपांवर एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) ला एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

---Advertisement---

स्थानिक पत्रकाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सेबी अधिकाऱ्यांनी अशा कंपनीच्या सूचीकरणास परवानगी दिली. जी नियामक निकष पूर्ण करत नव्हती, ज्यामुळे बाजारात गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. (Madhavi Puri Buch)

तक्रारीमध्ये सेबी आणि कॉर्पोरेट संस्थांमधील मिलीभगत, इनसाइडर ट्रेडिंग आणि सूचीकरणानंतर सार्वजनिक निधींचे अपहार यांचेही आरोप आहेत. तक्रारदाराने अनेक वेळा पोलिस आणि संबंधित नियामक संस्थांकडे धाव घेतली होती, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे न्यायालयीन हस्तक्षेप आवश्यक ठरला.

---Advertisement---

हिंडनबर्ग रिसर्चने ऑगस्ट 2024 मध्ये माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीवर अडाणी समूहाशी संबंधित ऑफशोअर संस्थांमध्ये अघोषित गुंतवणुकीचे आरोप केले होते. बुच दांपत्याने या आरोपांना खोटे आणि निराधार म्हटले होते.

या प्रकरणात, लोकपालनेही माधवी पुरी बुच यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे, ज्यासाठी त्यांना चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे आणि 30 दिवसांच्या आत स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा :

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles