पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – युवा हे सामाजिक परिवर्तनासाठी एक महत्त्वपूर्ण उत्प्रेरक आहेत. सामाजिक दबाव, पारंपरिक अपेक्षा आणि जुन्या रुढींना मोडून काढण्याचे धैर्य युवकांमध्ये असते. नव्या पिढीने आत्मविश्वासाने पुढे येत सामाजिक समस्यांना नव्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे आवश्यक आहे. (PCMC)
‘टेडेक्स पीसीसीओईआर’ कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद (PCMC)
त्यासाठी नेतृत्वगुण विकसित करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून ते समाजात सकारात्मक बदल घडवू शकतील. युवकांनी नवे विचार नव्या संधी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सामाजिक हितासाठी योगदान द्यावे. नव्या पिढीतील सर्जनशीलता आणि ऊर्जा समाजाला अधिक प्रगत न्याय आणि सशक्त बनविण्यास मदत करू शकते. परंतु हे सर्व करण्यासाठी प्रथम स्वतःला सक्षम व्हावे लागेल. देशातील युवक सक्षम झाला तरच देश सक्षम होईल असा कानमंत्र आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) येथे ‘टेडेक्स पीसीसीओईआर’ या कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात आ. तांबे बोलत होते.
यावेळी नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील, सीए मकरंद आठवले, अभिनेता सुयश टिळक, रॅप सिंगर मृणाल शंकर, यू ट्यूबर आणि स्पोर्ट्स कार रेसर कृष्णराज महाडिक, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख डॉ. राहुल मापारी, डॉ. त्रिवेणी ढमाले, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी कृष्णराज महाडिक यांनी युवकांनी डिजिटल माध्यम कसे हाताळावे, त्याचे फायदे व तोटे, त्याचा सामाजिक सकारात्मक, नकारात्मक परिणाम याबद्दल संवाद साधला. तसेच तरुणांमध्ये राजकारणाचे समाजकारणामध्ये रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते असे सांगितले.
नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांनी त्यांचा खडतर प्रवास सांगितला व बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी आपले ध्येय विसरून नये असी सांगितले. (PCMC) प्रास्ताविक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, स्वागत डॉ. राहुल मापारी यांनी तर त्रिवेणी ढमाले यांनी आभार मानले.

हे ही वाचा :
इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ
संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा
बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत
LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!