Wednesday, March 12, 2025

इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; लवकरच होणार पगारवाढ

Infosys Salary hike : देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ लागू करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने २४ फेब्रुवारीपासून पगारवाढीची अंमलबजावणी केली असून, ही वाढ ५ ते ८ टक्क्यांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०-१२ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आली आहे.

इन्फोसिसने पगारवाढीचे चार स्तर निश्चित केले आहेत. ज्यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन, सराहनीय कामगिरी, अपेक्षांच्या अनुरूप, सुधारणा आवश्यक असे स्तर निश्चित केले आहे. त्या श्रेणीनुसार वेतनवाढ करण्यात येणार आहे.

दुसरा टप्पा एप्रिल २०२५ मध्ये सुरू होणार (Infosys Salary hike)

बँड JL6 आणि त्याखालील कर्मचाऱ्यांसाठी १ एप्रिल २०२५ पासून पगारवाढ लागू होणार आहे. यापूर्वी, १६ जानेवारीला इन्फोसिसने जाहीर केले होते की, भारतातील कर्मचाऱ्यांसाठी ६-८% वार्षिक पगारवाढ जानेवारी २०२५ पासून सुरू केली जाईल.

टीसीएस वगळता इतर आयटी कंपन्यांनी पगारवाढीचा निर्णय लांबणीवर

महत्वाची गोष्ट म्हणजे टीसीएस वगळता इतर बहुतेक आयटी कंपन्यांनी वित्तीय वर्ष २०२५ मध्ये पगारवाढीच्या सायकलमध्ये विलंब केला आहे. यामुळे इन्फोसिसच्या या निर्णयाचा सकारात्मक परिणाम कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये होईल.

टॅक्स योग्य आय वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लाभ

इन्फोसिस सध्या ३.२३ लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देत आहे. मागील वेतनवाढ नोव्हेंबर २०२३ मध्ये लागू करण्यात आली होती. यावेळी, कमी पगारवाढ मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध भत्ते आणि इतर फायदे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इन्फोसिसचे तिमाही निकाल आणि नफा

डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत, इन्फोसिसचा शुद्ध नफा ₹६,८०६ कोटींवर पोहोचला, ज्यात ११.४% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा नफा ₹६,१०६ कोटी होता. कंपनीचा महसूल ₹४१,७६४ कोटींवर पोहोचला असून, यात ७.६% ची वाढ झाली आहे.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

हे ही वाचा :

संतापजनक : स्वारगेट बस डेपोत २६ वर्षीय तरूणीवर बलात्काराची घटना, डेपोतील धक्कादायक गोष्टी समोर

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश, अनेक वस्तू जप्त, १३ जण अटकेत

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles