Monday, February 3, 2025

दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ; माजी सैनिकाचा मृत्यू, पत्नी-मुलगी जखमी

कुलगाम (जम्मू-काश्मीर) : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी माजी सैनिकावर हल्ला केला असून, या गोळीबारात माजी सैनिकाचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलगी जखमी झाल्या आहेत. (Kulgam News)

मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्त सैनिक मंजूर अहमद यांच्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ल्याच्या वेळी ते आपल्या पत्नी आणि मुलीसोबत कारमध्ये प्रवास करत होते. गोळीबारात मंजूर अहमद यांच्या पोटात गंभीर जखम झाली, तर त्यांच्या पत्नी आणि मुलीला पायात गोळ्या लागल्या. उपचारासाठी तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मंजूर अहमद यांचा मृत्यू झाला.

हा 2025 मधील काश्मीर खोऱ्यातील पहिला दहशतवादी हल्ला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे. तसेच संपूर्ण क्षेत्राला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. मंजूर अहमद हे पाच वर्षांपूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते.

या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुरक्षा यंत्रणा हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. (Kulgam News)

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : सापुतारा येथे बस दरीत कोसळून 7 मृत्यूमुखी, 15 जखमी

शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा

इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प

पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या

धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या

क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Related Articles

- Advertisement -

Latest Articles