Nashik-Gujarat Highway accident : नाशिक-गुजरात महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. यात्रेकरूंनी भरलेली लक्झरी बस खोल दरीत कोसळून 7 जणांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुजरातमधील डांग जिल्ह्यातील सापुतारा (Saputara accident) हिल स्टेशनजवळ पहाटे 4.15 वाजता घडला.
चालकाचे नियंत्रण सुटले? (Saputara accident)
प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने क्रॅश बॅरियर तोडले आणि सुमारे 35 फूट खोल दरीत कोसळली. पोलिस अधीक्षक एस.जी. पाटील यांनी सांगितले की, बसमध्ये एकूण 48 यात्रेकरू प्रवास करत होते.
या भीषण अपघातात एकुण 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना अहवा येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
मध्य प्रदेशातील प्रवासी होते बसमध्ये
अपघातग्रस्त बसमधील प्रवासी हे मध्य प्रदेशातील गुणा, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील असल्याचे समजते. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा :
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू