Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी 3.0 सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार वर्ग, व्यापारी आणि उद्योजकांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या असून, काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत, तर काही महागल्या आहेत.(Union Budget)
सरकारने 36 महत्त्वाच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे, त्यामुळे कॅन्सरवरील उपचार अधिक परवडणारे होतील. याचा लाखो रुग्णांना फायदा होणार आहे.
🔹 जीवनावश्यक औषधांवरील कर सवलत; कॅन्सर उपचार होणार स्वस्त
🔹 काय स्वस्त होणार?
1.LED दिवे आणि टीव्ही
2.भारतात बनवलेले कपडे
3.मोबाईल फोनच्या बॅटऱ्या
4.इलेक्ट्रिक वाहन (EV)
5.LCD टीव्ही
6.लेदर जॅकेट, बूट, बेल्ट, पर्स
7.हँडलूम उत्पादन
🔹 काय महागणार?
1.आयात केलेले मोबाइल फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू
2.सोने आणि चांदीवरील कर वाढला
3.परदेशातून येणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क वाढले
🔹 वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रज्ञानासाठी मोठी गुंतवणूक :
- मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येणार, त्यामुळे
डॉक्टरांची संख्या वाढेल. - IIT मध्ये 6,500 नवीन जागा निर्माण केल्या जाणार, त्यामुळे तंत्रज्ञान शिक्षणाला चालना मिळेल.
🔹 AI आणि डिजिटल क्षेत्रात मोठी गुंतवणूक : (Union Budget)
- देशात 3 नवीन AI Excellence Centers स्थापन केले जाणार.
- स्टार्टअप आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार.
🔹 डाळींच्या उत्पादनासाठी सरकारचा मोठा निर्णय :
- डाळींसाठी 6 वर्षांचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार
- तूर, उडीद आणि मसूर उत्पादनावर विशेष लक्ष दिले जाणार
- भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष योजना हाती घेतली जाणार
यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल क्षेत्राला चालना देणाऱ्या अनेक घोषणा केल्या असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Union Budget
हे ही वाचा :
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
मोठी बातमी : 40 लाख द्या, MPSC ची प्रश्नपत्रिका देतो; विद्यार्थ्यांना फोन, राज्यात खळबळ
घर घेणाऱ्या इच्छुकांसाठी धक्का! १ एप्रिलपासून रेडीरेकनर दरात १० टक्के वाढ
संतापजनक : गोरेगावमध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, 20 वर्षीय तरुण अटकेत
महाकुंभ मेळ्यातील व्हायरल मोनालिसा चित्रपटात दिसणार ! प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर