कल्याण : कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा अर्थिक भार उचलण्यास राज्य सरकार (State Government) तयार असल्याचे राज्याचे अर्थ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सादर केलेल्या राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात ( Budget ) आश्वासित केले आहे. कल्याण-मुरबाड-माळशेज या रेल्वेमार्ग प्रकल्प हा 45 वर्षापासून रखडला आहे.
तीन वर्षापूर्वी झाले होते भूमीपूजन
ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या तेव्हापासून हा पाठपुरावा सुरु आहे. कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचा कामाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते मुंबईत ऑनलाईनद्वारे करण्यात आले होते. भूमीपूजन होऊन 3 वर्षे उलटून गेली तरी या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी कल्याण मुरबाड माळशेज रेल्वे मार्गासाठी राज्य सरकार आर्थिक भार उचलण्यास तयार असल्याचे आश्वासित केले.
अंशकालीन स्त्री परिचरांचा राज्य सरकार विरोधात एल्गार, आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकणार
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी किमान दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रेल्वे प्रकल्पाचा राज्य आणि केंद्र सरकार अर्धा खर्च उचलते. त्यानुसार राज्य सरकारचा आर्थिक भार उचलण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले आहे.
शेतमाल थेट मुंबईच्या बाजारात लवकर पोहचणार
कल्याण मुरबाड रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागल्यास मुरबाड नगरहून येणाऱ्या शेतमाल कल्याण बाजारपेठेत वेळेत पोहचविणे शक्य होईल. रेल्वेचा प्रवास स्वस्त असतो. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना कल्याणमध्ये शिक्षणासाठी येण्यासाठी सोय होणार आहे.
.. तर निवडणुका होतील, गाफील राहू नका – अजित पवार
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा, आझाद मैदानावर होणार “संताप मोर्चा”
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता !