Thursday, January 23, 2025

अंशकालीन स्त्री परिचरांचा राज्य सरकार विरोधात एल्गार, आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकणार

नाशिक : महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचर कृती समितीने राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. राज्य सरकारने बजेटमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची निराशा केल्याने दि. १६ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्यात येणार आहे ‌‌.

समितीचे सदस्य राजू देसले म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आपण आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने तालुका व जिल्हा पासून ते आझाद मैदानावर आंदोलनात उतरलो. राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही मागण्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे आपण बजेट जाहीर होईपर्यंत जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू ठेवण्याचा व बजेटमध्ये काही ठोस पदरात न पडल्यास १६ मार्च रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा, आझाद मैदानावर होणार “संताप मोर्चा”

आज बजेट जाहीर झाले. आरोग्य स्त्री कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मानधन वाढ पण नाही झाली. त्यामुळे आपल्या पदरात अजूनच निराशा पडली. त्या निराशेचे संतापात रुपांतर झाले असल्याचेही राजू देसले म्हणाले. 

स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या  सेवेत कायम करा. आणि पात्रतेनुसार वर्ग 3 व वर्ग 4 पदावर  नियुक्ती द्या. प्रत्येक अंशकालीन  स्त्री परिचरांना त्या पूर्णवेळ काम करत असल्यामुळे दरमहाचे एकत्रित वेतन रूपये 18000 हजार द्या. संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्या शिफारशी प्रमाणे स्त्री परिचरांना तूर्तास रूपये 10000 एकत्रित वेतन ताबडतोबीने द्या, आयुक्तालायचे पत्र दि 11नोव्हेंबर 2020 प्रमाणे तूर्तास रूपये 6000 वेतन द्या, स्त्री परिचरांना पेन्शन  योजना  लागू करा. रजा सुट्टया चा लाभ द्या. आणि  प्रवास भत्ता द्या, स्त्री परिचरांना शासकीय गणवेश  द्या, अंशकालीन स्त्री परिचरांच्या रिक्त जागा भरा, दरमहाचे  मासिक वेतन  ठराविक तारखेला  नियमित  करा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता !

पत्रकावर एम ए.पाटील, नामदेव चव्हाण, राजू देसले, अब्दुल गफार, निलेश दातखिळे, सुशीला यादव, सूर्यमणी गायकवाड, देविदास बोदाडे, शालूताई कुथे, दिवाकर नागपुरे, हमीदा शेख, भुगाजी बुरुड, दिलीप उटाणे, इंदुमती केवट, चित्रा जकताप, कुशावती पोपळे, गंगुबाई माने, विठ्ठल करंजे, रत्नमाला गायकवाड, सुचिता गायकवाड, हसीना शेख, विनू गावित आदींची नावे आहेत.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles