Friday, March 14, 2025

PCMC : मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आदिवासी पाड्यावरील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील गरीब, गरजू एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (PCMC)

‘ज्ञानदान व वही – पुस्तक दान श्रेष्ठ दान’ या उपक्रमांतर्गत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकांसह इतर शालेय साहित्य वाटप करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील डोणी तिरपाड, नान्हवडे, आहुपे या आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांमधील एक हजार विद्यार्थी व विद्यार्थिनीना शालेय साहित्याचे वाटप व दहावीतील विद्यार्थ्यासाठी २१ अपेक्षित प्रश्न संच, तसेच पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. (PCMC)

यावेळी निवृत्त विक्रीकर उपायुक्त डी बी घोडे, कृष्णाजी भालचिम, खेमा वडेकर, सखाराम वालकोळी, किशोर आटरगेकर, तसेच सह्याद्री आदिवासी विकास मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

याबरोबरच कार्यक्रमाला तिरपाडचे सरपंच सोमा दाते, ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजगुरू, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, मुख्याध्यापक सोमनाथ लोहकरे, सदू इंदोरे, बबन भोईर, लक्ष्मण गवारी, दीपक मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य शैला आंबवणे, दत्तू आंबवणे, कुंदा गवारी, गोविंद पारखे, भीमा गवारी, मुख्याध्यापक प्रकाश इंदोरे, शंकर लोधी, शोभा आसवले, रमेश लोहकरे, दीपक घोईरत, बबन घोईरत, शिक्षक प्रवीण बिरादार चंद्रमणी वाघ बबन केंगळे, दादासाहेब सगळे रावसाहेब मंडलिक गिरिधारी कदम आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते. (PCMC)

सोमा दाते म्हणाले, की अरुण पवार यांचे सामाजिक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पवार बंधूनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. याच जाणीवेतून अरुण पवार यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles