Monday, February 10, 2025

संतापजनक : डॉक्टर रिल्स पाहण्यात मग्न, रुग्णाचा मृत्यू ; व्हिडिओ पाहुन तुम्हीही संतापाल !

Mainpuri : डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी धक्कादायक घटना मैनपुरी येथील महाराजा तेजसिंह जिल्हा रुग्णालयात घडली आहे. उपचाराऐवजी सोशल मीडियावर रिल्स पाहण्यात व्यस्त असलेल्या डॉक्टरांमुळे एका 60 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

वेळीच उपचार मिळाला असता तर…

मोहल्ला सौथियाना येथील प्रवेश कुमारी या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना तातडीने आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपस्थित डॉक्टर आदर्श सेंगर हे रुग्णावर उपचार करण्याऐवजी सोशल मीडियावर रिल्स पाहण्यात व्यस्त असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच या घटनेच्या CCTV फुटेज मध्येही दिसत डॉक्टर मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णाचा मृत्यू? (Mainpuri)

प्रवेश कुमारी यांची तब्येत अधिक बिघडत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरांना वारंवार विनवण्या केल्या. मात्र, त्यांनी नर्सला रुग्ण पाहण्यास सांगितले आणि स्वतः स्क्रीनमध्ये मग्न राहिले. वेळेवर उपचार मिळाला असता तर प्रवेश कुमारींचा जीव वाचू शकला असता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

डॉक्टरांकडूनच कुटुंबीयांना मारहाण

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाला विरोध करताच कुटुंबीयांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच मारहाण केली. मृत महिलेचा मुलगा गुरुशरण सिंग याला डॉक्टरांनीच मारल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रकरणाचा तपास सुरू

घटनेनंतर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मदनलाल यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे संतापाची लाट उसळली असून, रुग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

चीनच्या नव्या चॅटबॉटमुळे जगभरात खळबळ, अनेक कंपन्यांचे शेअर कोसळले

मोठी बातमी : राज्यात लवकरच 10,000 जागांसाठी पोलिस भरती

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, १७ जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्य टीम पुण्यात येणार

चिमुकल्याने 26 जानेवारीला सादर केला लावणीवर भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल

ऑनलाईन गेमिंगमुळे 17 वर्षीय तरुणीची हाताची नस कापून गळ्यावर जखम

धक्कादायक : अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून, मारून टाकण्यासाठी दिली 100 रुपयांची सुपारी

Related Articles

- Advertisement -

Latest Articles