Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १५ मार्च रोजी रोज्य सरकार विरोधात एल्गार, ‘या’ आहेत मागण्या

---Advertisement---

---Advertisement---

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा झाली असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती १५ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनात उतरल्या आहेत. मानधनात वाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईल, दैनंदिन माहिती भरण्यासाठी मराठीमधील चांगले ॲप, लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार, अंगणवाड्यांच्या भाड्यात वाढ, किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ, रिक्त जागांवर भरती, पदोन्नती आदी मागण्यांसाठी त्यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये अनेकदा आंदोलने केली. २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली. तीन दिवसांचे आंदोलन त्यांच्या आश्वासनामुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले गेले.

राज्य सरकारच्या बजेटमध्ये काही मागण्या पदरात पडतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी बजेट जाहीर होईपर्यंत जिल्हा पातळीवर आंदोलन सुरू ठेवण्याचा व बजेटमध्ये काही ठोस पदरात न पडल्यास १५ मार्च रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेत्या शुभा शमीम यांनी सांगितले.

अंशकालीन स्त्री परिचरांचा राज्य सरकार विरोधात एल्गार, आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकणार

काल बजेट जाहीर झाले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याची घोषणा वगळता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. मानधन वाढीची काही वाहिन्यांनी दिलेली बातमी खोटी व गैरसमज पसरवणारी होती. त्यामुळे त्यांच्या पदरात अजूनच निराशा पडली. त्या निराशेचे संतापात रुपांतर झाले. त्यातूनच कृती समितीच्या बाहेरच्या काही अपरिपक्व संघटनांनी खातरजमा न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

कृती समितीने या सर्व पार्श्वभूमीवर ताबडतोब ऑनलाईन बैठक घेऊन १५ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या बजेटने तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेच होते. आता राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली असल्याचे म्हटले आहे.

पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वेच्या भू – संपादनास वेग

१५ मार्च २०२२ रोजी अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होऊन आपला संताप व्यक्त करतील. तर २८ – २९ मार्चच्या देशव्यापी सार्वत्रिक संपात उतरून केंद्र सरकारची अंगणवाडी कर्मचारी, कामगार, शेतकरी विरोधी धोरणे रोखण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी एल्गार पुकारतील आणि जिल्हा व तालुका पातळीवर तीव्र आंदोलन करतील, असे कृती समितीचे एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील यांनी म्हटले आहे.


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles