नागपूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (CPIM) राज्य अधिवेशन येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान नागपूर येथे संपन्न होणार असून अधिवेशनाची आमसभा 20 मार्च ला दुपारी ठीक 1 वाजता वसंतराव देशपांडे सभागृह येथे संपन्न होणार आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार कॉ. सीताराम येचुरी करणार आहेत. प्रसिद्ध शेतकरी नेते विजय जावंधिया तर माकप पॉलीट ब्युरो सदस्य कॉ. निलोत्पल बसू केंद्रीय समिती सदस्य कॉ. अशोक ढवळे, राज्य सचिव नरसय्या आडम, केंद्रीय समिती सदस्य कॉ. मरियम ढवळे, माजी आमदार जे. पी. गावित यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा १५ मार्च रोजी रोज्य सरकार विरोधात एल्गार, ‘या’ आहेत मागण्या
कल्याण-मुरबाड-माळशेज रेल्वे मार्गासाठी लागणारा आर्थिक भार राज्य सरकार उचलणार !
अंशकालीन स्त्री परिचरांचा राज्य सरकार विरोधात एल्गार, आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने धडकणार