पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शनिवार दि. 11 जानेवारी 2025 ” युवा ऑलिम्पिक 2025 भारतीय सैन्य दिनाच्या निमित्ताने मस्के टीयर्स युथ फाऊंडेशन आणि सेवा विश्वंम फाउंडेशनच्या वतीने निगडी येथील मदनलाल धिंग्रा क्रीडांगण येथे बौद्धिक अक्षम व ऑटिझम या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. (PCMC)
यावेळी अभिराज फाउंडेशन वाकड, अनिकेत सेवाभावी संस्था, आशा स्कूल, ब्रह्मदत्त विद्यालय निगडी, सोफेश तारा फाउंडेशन गुरव पिंपळे, वृक्षवेल संस्था भोसरी,एकूण सहा शाळेतील 76 दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2025/01/1000500726-1024x768.jpg)
100 मीटर रनिंग, 50 मीटर रनिंग, सॉफ्ट बॉल थ्रो, गोळा फेक, क्लब थ्रो, स्टॅंडिंग जम्प या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (PCMC)
या क्रीडा स्पर्धेचा बक्षीस शुभारंभ दिव्या वाजपेयी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेवा विश्व ग्लोबल फाउंडेशन,भोसले माजी सैनिक, रमेश मुसडगे डायरेक्टर अभिराज फाउंडेशन वाकड यांच्या हस्ते पार पडला.
या क्रीडा स्पर्धचे नियोजन केले होते.नरेंद्र अहिरे,वैभव, अभिराज फाउंडेशनचे क्रीडा शिक्षक विकास जगताप, ऋषिकेश मुसूडगे, योगेश आढले, कुणाल गायकवाड यांनी क्रीडा स्पर्धा मध्ये अभिराज फाउंडेशन वाकडच्या विद्यार्थ्यांनी 12 सुवर्णपदक, 9 सिल्वर पदक, 8 ब्राँझ पदक असे उल्लेखनीय यश मिळवले.
या यशा बद्दल अभिराज फाउंडेशनच्या डायरेक्टर स्वाती तांबे, रमेश मुसुडगे, मुख्याध्यापिकाअनिता चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.