Wednesday, February 5, 2025

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन मोबाईलवर मिळणार

MSRTC ST Bus : नवीन वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आपल्या प्रवाशांसाठी एक खास सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण भागातील एसटीच्या प्रवाशांसाठी ही सुविधा वरदान ठरणार आहे. आता लालपरीच्या प्रवासाचा थेट अनुभव प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे.

MSRTC ST Bus बसचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर

एसटी महामंडळाने विकसित केलेल्या नवीन मोबाईल अॅपद्वारे प्रवाशांना एसटी बसचे लाईव्ह लोकेशन जाणून घेता येणार आहे. प्रवाशांना त्यांच्या तिकीटावरील क्रमांकाच्या माध्यमातून बस नेमकी कोणत्या ठिकाणी आहे आणि ती त्यांच्या स्थानकावर कधी पोहोचेल, याची माहिती अगोदरच मिळेल.

प्रवाशांचा वेळ आणि गैरसोयीला पूर्णविराम

मागील काळात प्रवाशांना बस स्थानकावर तासंतास ताटकळत बसावे लागत होते. मात्र, आता या नवीन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल. एसटीच्या प्रत्येक गाडीत व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविण्यात येणार असून, या प्रणालीच्या मदतीने 24 तास आधीच बसचे थांबे आणि अपेक्षित वेळ याची माहिती मोबाईलवर मिळणार आहे.

मुंबई सेंट्रलमध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना

एसटीच्या ताफ्यात 50 हजार मार्गांवर दररोज सव्वालाख फेऱ्या होत असतात. त्यामुळे या सुविधेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी एसटीच्या मुंबई सेंट्रल कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी एसटीचा डिजिटल प्रवास

एसटीच्या अॅपमधील ट्रॅक बस या फिचरद्वारे प्रवाशांना केवळ बसचे लाईव्ह लोकेशनच नव्हे, तर इतर मार्गावरील गाड्या, त्यांचे थांबे आणि वेळ देखील समजणार आहे. ही सुविधा लवकरच सुरू होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट

Related Articles

- Advertisement -

Latest Articles