Monday, January 13, 2025
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मराठी माणसाची लढाईत जित तर तहात हार - प्रा. नाईकवाडी

PCMC : मराठी माणसाची लढाईत जित तर तहात हार – प्रा. नाईकवाडी

पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – सर्व क्षेत्रात मराठी माणसाने बऱ्याच क्रांतीकारी घटना घडवून सामाजिक स्थित्यंतरे घडवली. तरीपण मराठी माणूस युद्धात जिंकतो पण तहात हारतो. अशी खंत प्रा शंकर नाईकवाडी यांनी केली, शरद नगर चिखली येथील स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने तीन दिवशीय व्याख्यानमालेचे उदघाट्न आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. (PCMC)

नाईकवाडी यांनी “महाराष्ट्रातील समाज जीवनामधील स्थित्यानंतर- काल -आज आणि उदया ” या विषयावर पहिले पुष्प गुंफले. यावेळी पो निरीक्षक विठ्ठल साळुंके,माजी नगरसेविका मंगलाताई कदम,योगिता नागरगोजे, निलेश नेवाळे, मिलिंद वराडकर, सचिन सानप, अध्यक्ष रामराजे बेंबडे हे उपस्थित होते.

प्रा. नाईकवाडी पुढे म्हणाले कि, ज्ञानदेवांनी अध्यात्माचा रचला. तुकाराम महाराजांनी दुर्जनाच्या माथी काठी हाणू असे म्हंटले, पण आज ती काठी हरवली आहे. पुढे शिवरायांनी मराठा सम्राज्य उभे केले.त्यांनी रोज लढाईचे नियोजन केले. मात्र लढाईत महाराज जिंकले मात्र तहात हारले. पुढे भारतात इंग्रज येऊन भारतावर राज्य केले. यावेळी बरेच क्रांतिकारी घटना घडल्या. बरेच भारतीय शहीद झाले.देश स्वातंत्र्य झाला.अशा काळात ही मराठी माणसाला महाराष्ट्र मिळण्यासाठी 105 जणांचे प्राण द्यावे लागले.ती लढाई स्वकी्यांसोबत करावी लागली हे दुर्दैव ठरले आहे.

कालांतराने कला, नाट्य, संगीत, सिनेमा समृद्ध असा महाराष्ट्र बनत गेला. त्यातही यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान पदाची संधी असताना उप – पंतप्रधान पदावर समाधान मानावे लागले. असे अनेक प्रसंग सांगून मराठी माणसाची पीछेहाट होण्याच्या घटना सांगितल्या.

PCMC

आपल्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असताना देखील कालही मराठी नेते दिल्ली पुढे झुकत होते,आजही तीच स्थिती आहे.आज आपल्याच मराठी मुलखात परप्रांतीय येत असल्याने आपणच हद्दपार होतो कि काय? अशी भीती वाटू लागली आहे.

आमदार लांडगे यांनी स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने स्वामीजींचे विचाराचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगून कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद वेल्हाळ यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश आवटे यांनी तर आभार संतोष ठाकूर यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश मांडवकर, अशोक हाडके, दिलीप खंडाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

एसटी प्रवाशांसाठी खूशखबर : लालपरीचे लाईव्ह लोकेशन आता मोबाईलवर मिळणार

१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध

वडीलांनी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या, वडिलांनीही संपवलं जीवन

‘लाडकी बहीण’ योजनेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले, मोफत पैसे…

केरळ मंदिर महोत्सवात हत्तीने माणसाला उचलून हवेत फेकले, भीषण व्हिडिओ

तिरुपती बालाजी मंदिरात भगदड: ६ भाविकांचा मृत्यू

पीएम आवास योजना ते पीएम किसान पर्यंत, बजेटमध्ये या सरकारी योजनांना मिळू शकतो बूस्ट

संबंधित लेख

लोकप्रिय