Wednesday, February 5, 2025

TATA MOTORS : टाटा मोटर्सचा मारुती सुझुकीला मोठा धक्का, संपवले 40 वर्षांचे वर्चस्व

TATA MOTORS (क्रांतीकुमार कडुलकर) : भारतामध्ये ४० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे की सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती सुझुकीची नाही. २०२४ मध्ये मारुती सुझुकीचा कार विक्रीचा विक्रम तुटला आहे. टाटा मोटर्सची ‘पंच’ ही कार मारुतीला मागे टाकून भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. (TATA MOTORS)

पंचने मारुतीच्या वैगनआर, अर्टिगा आणि स्विफ्टसारख्या गाड्यांना मागे टाकून हे यश मिळवले आहे.

इंडिपेंडेंट ऑटोमोटिव रिसर्च प्लॅटफॉर्म Autopunditz च्या डेटानुसार, टाटा मोटर्सची सब-कॉम्पॅक्ट SUV टाटा पंचने भारतातील सर्वात मोठ्या कार निर्मिती कंपनीच्या प्रत्येक कारला मागे टाकले आहे. याशिवाय, ही कार गेल्या वर्षी २ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री करणारी पॅसेंजर व्हेईकल कार ठरली आहे.

TATA MOTORS ने मारुति सुझूकीला मार्केट मध्ये मोठा धक्का दिला आहे! 40 वर्षांच्या कार विक्रीच्या स्पर्धेत मारुती सुझुकीचे टाटा मोटर्सने वर्चस्व संपवले आहे.

Maruti Suzuki vs TATA:

टाटा मोटर्सच्या सब-कॉम्पॅक्ट SUV, टाटा पंच ने 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकत एक नवीन विक्री विक्रम तयार केला आहे.

2024 मध्ये टाटा पंचच्या 2,02,000 युनिट्सची विक्री झाली, जी देशातील सर्वाधिक लोकप्रिय मारुति वॅगन आर आणि एर्टिगा या मॉडेल्सच्या विक्रीपेक्षा जास्त होती. या दोन्ही मॉडेल्सची विक्री अनुक्रमे 1,90,000 युनिट्स होती. विशेष म्हणजे, 2024 मध्ये भारतात विक्री होणाऱ्या टॉप-5 कार्सपैकी तीन SUV होत्या, जे दर्शवते की भारतीय ग्राहकांचा कल आता मोठ्या गाड्यांकडे वळला आहे.

2021 मध्ये लॉन्च झालेली टाटा पंच

टाटा पंच 2021 मध्ये लॉन्च झाली होती आणि तिच्या पहिल्या महिन्यातच 10,000 युनिट्सची विक्री केली होती. 2022 पर्यंत, ती देशातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार बनली होती. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि उत्कृष्ट ग्राउंड क्लीरन्समुळे ही कार ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे.

हिंदुस्तान मोटर्सला मागे टाकून बनली होती नंबर 1

आजपासून 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1985 मध्ये, हिंदुस्तान मोटर्सची एंबेसडर कारला मागे टाकत मारुति 800 ने भारतात सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणून आपले स्थान स्थापित केले होते. त्यानंतर, मारुति सुजुकीने अल्टो आणि स्विफ्टसारख्या मॉडेल्सद्वारे भारतीय बाजारपेठेवर 40 वर्षे राज्य केले. मात्र, 2024 मध्ये टाटा मोटर्सने आपली रणनीती आणि नवकल्पकतेच्या जोरावर मारुतीचे हे वर्चस्व तोडले आहे.

TATA MOTORS

टाटा मोटर्सच्या या आश्चर्यकारक कामगिरीदरम्यान, इतर ऑटोमोबाइल कंपन्याही भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध मॉडेल्स लॉन्च करत आहेत.

होंडा लवकरच भारतात आपली नवीन SUV होंडा एलिवेट ब्लॅक एडिशन लॉन्च करणार आहे. ही कार 7 जानेवारी रोजी बाजारात दाखल होईल आणि दोन वेरिएंट्समध्ये उपलब्ध असणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : आसाराम बापूला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर

चोरी करायला गेला अन् महिलेचा मुका घेऊन आला, आरोपी अटकेत

आळंदीच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

दिल्ली विधानसभा निवडणूकीची घोषणा, वाचा कधी होणार मतदान

52 वर्षीय गोली श्यामला यांचा 150 किमी समुद्रात पोहण्याचा विक्रम

मोठी बातमी : HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव, दोन मुलांना संसर्ग

मोठी बातमी : लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये ; सरकारकडून मोठी घोषणा

Related Articles

- Advertisement -

Latest Articles