नवी दिल्ली (वर्षा चव्हाण) : आगामी अर्थसंकल्पात केंद्र सरकार 15 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना मोठा गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. याची घोषणा अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून केली जाऊ शकते. अर्थसंकल्पात 15 लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Breaking)
1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाईल, ज्यात कर कपातीचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या मध्यमवर्गीय करदात्यांना होणार आहे. वाढती महागाई आणि कर यामुळे 10 ते 15 लाख उत्पन्न असणाऱ्या कुटुंबियांवर अधिक भार पडत आहे.
सध्याच्या जुन्या टॅक्स स्लॅबनुसार 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर द्यावा लागतो. तर नव्या टॅक्स स्लॅबनुसार 15 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास 30 टक्के कर लागू होता. मात्र नव्या स्लॅबमध्ये सेक्शन 80 सी, सेक्शन 80 डी नुसार मिळणाऱ्या सवलतींचा फायदा मिळत नाही. (Breaking)
विकासाचा वेग वाढवण्यासाठी अर्थतज्ञांनी कर कपात करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसे राहतील आणि ज्यामुळे खरेदीसाठी प्रोत्साहन मिळेल. (Breaking)
कर कमी केल्यामुळे सरकारचे किती नुकसान होईल याचा देखील आढावा घेतला जात आहे. याबाबत निर्णय अर्थसंकल्पात घेतला जाईल.
Breaking : मध्यमवर्गीयांना मिळणार आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठा दिलासा
- Advertisement -