Wednesday, February 5, 2025

Alandi : स्वाभिमानाने सुटतील दिव्यांगांचे प्रश्न

आळंदी (अर्जुन मेदनकर) : स्पर्धेच्या युगात आज एवढी प्रगती होऊन देखील दिव्यांगांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. हे लक्षात घेऊन दिव्यांगां नीच एकत्र येऊन दिव्यांगांसाठी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने एक उचललेले पाऊल म्हणजे दिव्यांग स्वाभिमान संस्था ( महाराष्ट्र राज्य) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची ध्येय धोरणच असे आहेत की जेणे करून दिव्यांगांच्या सूक्ष्मते, अधिसूक्ष्म समस्या सुटतील हा या संस्थेचा मुख्य उद्देश असेल असे प्रतिपादन गहिनीनाथ नलावडे यांनी केले. (Alandi)

आळंदी येथील गोपाळपूर या संस्थेचा उद्घाटन समारोह आळंदी संत सेना महाराज कार्यालयात पार पडला. या प्रसंगी सक्षम पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष माननीय ॲड. मुरलीधर जी कचरे, वस्ती संयोजक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दानेशजी तिमशेट्टी, गणेशजी गरुड आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वतः मधले गुण ओळखून पुढे जाण्याची प्रेरणा घेणे अपेक्षित आहे असे प्रतिपादन याप्रसंगी दानेश तिमशेट्टी यांनी केले. गणेशजी गरुड यांनी संस्थेला शुभेच्छा देत संस्थेच्या आवश्यकते नुसार सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. (Alandi)


सेवितही सेवक बन जाए ही भावना दिव्यांगांनी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वाटचाल केली आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात वेगळे उदाहरण आहे असे मत असे कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गहिनीनाथ नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन किशोरजी रासकर यांनी केले.
आळंदी नगरपालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग वहिले यांनी संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आश्वासित केले.

याप्रसंगी अँड वंदना नवघरे, विजय पगडे संतोष इंदलकर, अमोल देशमुख, प्रवीण भरम, फुलचंद ढवळे, शिवशंकर मुंडे, राजेंद्र बेंद्रे, अर्चना ताई घुंडरे, नाना जगदाळे, दत्ता गावडे, बाळू दुबाले, भाऊसाहेब आवटे, संदीप गद्रे, अशोक सोनवणे, सचिन वाघमारे यांच्यासह संस्थेचे कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित नामवंत मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles