पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – चिंचवड पोलीस ठाणे आणि नानक साई सेवा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने “दूध प्या, दारूला नाही म्हणा ” या मोहिमेचे आयोजन करण्यात आले. (PCMC)
या उपक्रमाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि पोलीस उपनिरीक्षक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या मोहिमेचा उद्देश समाजामध्ये आरोग्यपूर्ण जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देणे हा होता.
या प्रसंगी अनेक तरुण ज्येष्ठ वाहनचालक तसेच समाजातील अनेक व्यक्तींना या योजनेचे महत्त्व पटऊन देण्यात आले दूध प्या दारूला नाही म्हणा या योजनेचा प्रचार प्रसार समाजात करावा अशी विनंती सर्वांना करण्यात आली अनेकांनी स्वतः येऊन या उपक्रमाची माहिती घेतली आणि नानक साई सेवा ट्रस्ट करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. (PCMC)
या उपक्रमा दरम्यान सुमारे २०० ग्लास दूध वाटप करण्यात आले. “स्वच्छ आणि आरोग्यदायी समाज” हा या मोहिमेचा मुख्य संदेश होता.
नेतृत्व व सहभागी:
या मोहिमेचे नेतृत्व नानक साई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कमलजीत सिंग आणि उपाध्यक्ष जस्मीत सिंग यांनी केले.
तसेच या मोहिमेमध्ये श्रीकृष्ण मुंडे, अनिल पवळ, सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी, राकेश सायकर, उदय वाडेकर, प्रकाश मिर्झापुरे, सुशील मालुसरे, मनोज पाटील, प्रशांत शेनॉय, सतीश पोफळे, दत्ता दुधाळ, रफिक बागवान, वसंत ढवळे, मंगेश कवी
इत्यादी सर्व सदस्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून हा कार्यक्रम यशस्वी केला.
ही मोहीम चिंचवड पोलीस आणि नानक साई सेवा ट्रस्ट यांच्या समाजातील आरोग्यदायी परिवर्तनासाठी असलेल्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.