Dilip Shankar Dies : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर (Dilip Shankar) यांचे निधन झाले असून, ते तिरुअनंतपुरममधील एका हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर दोन दिवसांपासून हॉटेलच्या खोलीतून बाहेर आले नव्हते.
१९ डिसेंबरला एका मालिकेच्या शूटिंगसाठी शंकर हॉटेलमध्ये थांबले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांना शेवटचे पाहिले होते. वारंवार कॉल करूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, शंकर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शवविच्छेदन अहवालात असे स्पष्ट झाले आहे की, डोक्याला लागलेल्या दुखापतीमुळे अंतर्गत रक्तस्राव झाला असावा, ज्यामुळे शंकर यांचा मृत्यू झाला. त्यांना यकृताशी संबंधित समस्या असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Actor Dilip Shankar passed away
दिलीप शंकर (Dilip Shankar) यांनी ‘चप्पा कुरीशु’ आणि ‘उत्तर २४ कथा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. त्यांनी ‘पंचाग्नी’ या मालिकेत चंद्रसेननची भूमिका साकारली होती, तर अलीकडेच ‘अम्मयारियाते’ या टीव्ही मालिकेत त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी मोठी प्रशंसा मिळवली होती.
शंकर यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाबद्दल सहकाऱ्यांनी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : पुजाऱ्यांना मिळणार दरमहा 18,000 सन्मान निधी
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ