नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा कौन्सिल वतीने पक्षाच्या वर्धापन दिनी सकाळी पक्ष कार्यालयात पक्षाचा झेंडा वंदनाचा कार्यक्रम सकाळी पार पडला कॉ. मुक्ता मनोहर पगारे यांच्या हस्ते झेंडावंदन कऱण्यात आले. या प्रसंगी कॉ. राजू देसले, कॉ. प्राजक्ता कापडणे, कॉ. भीमा पाटील, कॉ. मनोहर पगारे, कॉ. दत्ता गायधनी, कॉ. भिका मांडे, कॉ. महेश चौधरी, राजेंद्र जाधव, राहूल भुजबळ, कॉ. नक्षीता आदि उपस्थित होते.आणि सायंकाळी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा पार पडला. (Nashik)
त्याप्रसंगी “भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे १०० वर्षांचे वैचारिक व ऐतिहासिक प्रवास” या विषयावर प्रा. अशोक सोनवणे यांचे व्याख्यान झाले या व्याख्यानाचे अध्यक्षस्थानी कॉम्रेड राजू देसले राज्य सह सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र होते. तसेच विचार मंचवर कॉ. व्हीं डी धनवटे, कॉ. मिना आढाव, कॉ. दत्तू तुपे होते. अशोक सोनवणे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 व्यां वर्षात पदार्पण करत आहे. यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याग, बलिदान देऊन उभा राहिला आहे. स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या संख्येने कम्युनिस्ट पक्ष नेते कार्यकर्ते सहभागी होते. अनेकांनी तुरुंगवास भोगला आहे. शेतकरी, कामगार चळवळ उभारून श्रमिक मुक्ती साठी लढा दिला आहे. कम्युनिस्ट पक्ष ने कॉ. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर सारखे उज्वल परंपरा दिली आहे. त्यांचे पक्ष कार्यात संयुक्त महारष्ट्र आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. (Nashik)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/12/WhatsApp-Image-2024-12-27-at-10.56.25-AM.jpeg)
कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. इंदर्जीत गुप्ता, कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. पुंजा बाबा गोवर्धने कॉ. सुदाम देशमुख, कॉ. शहीद कॉ. कृष्णा देसाई, कॉ. गोविंद पानसरे, असे अनेक त्यागी अभ्यासू नेते देशाला दिली आहेत. देश त शेतकरी, कामगार, जनतेच्या हितासाठी लढणारे नेते कार्यकर्ते भाकप दिली आहेत. त्यामूळे अनेक कायदे निर्माण झाले. सामजिक , सांस्कृतिक चळवळीतून समाजवादी विचार जनतेत रुजवयचे कार्य केले आहे. भारतीय संविधाान अंमलबजावणी होण्यासाठी, देशात धर्म निरपेक्षता, समाजवादी देश निर्माण करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मजबूत झाला पाहिजे. कारण भांडवली अर्थ वेवस्था तून जनतेचे मूलभूत प्रश्न सुटत नाही आहे. त्यामूळे कम्युनिस्ट चळवळ जनतेच्या खऱ्या प्रश्नासाठी लढू शकते त्याला जनतेने साथ दिली पाहिजे. असे आवाहन सोनवणे यांनी केले केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ राजू देसले यांनी पक्षाच्या 100 व्या वर्ष ला आज सुरुवात होत आहे. त्या निमित्ताने वर्षभर विवीध कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याग, संघर्ष, बलिदान तून उभा राहिला आहे. पक्षाच्या जन संघटना शेतकरी, कामगार , जनतेच्या हितासाठी लढा देत आहेत. भारतात समाजवाद यावा यासाठी लढा देत आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष ने गेलीं 100 वर्ष केलेलें कार्य जनतेत नेन्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष ने प्रगतीशील लेखक, शाहीर, प्रामाणिक कार्यकर्ते देशाला दिली आहेत. वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले. भारतीय कम्युनिस्ट पक्ष व जन संघटना नी केलेल्या कार्याचा माहिती, छायाचित्र आंदोलन माहिती संकलित करून भारतीय कम्युनिस्ट पक्ष चां जिल्हा, राज्य व देश पातळीवर चा इतिहास लिहिला जाणार आहे. तरी माहिती पाठवावी असे आवाहन राजू देसले यांनी केले. या प्रसंगी नाशिक शहर व जिल्ह्यातील साम्यवादी, समाजवादी, आंबेडकरी, सत्यशोधकी, कामगार-किसान-शेतमजूर, महिला, विद्यार्थी-युवक, सांस्कृतिक-साहित्यिक चळवळीतील कार्य कर्ते सहानुभूतीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कापडणे यांनी केले. स्वागत जिल्हा सह सचिव दत्तू तुपे यांनी केले. आभार रविकांत शार्दूल यांनी केले.
या प्रसंगी शिवदास म्हसदे, अभिजीत गोसावी, काॅ. नामदेवराव बोराडे, कॉ. भिमा पाटील, काॅ. रविकांत शादुल, काॅ. रामचंद्र टिळे, काॅ.कैवल्य चद्रांत्रे, काॅ.काशीनाथ वेलदोडे, काॅ. शरद आहीरे, चारुदत्त पवार, राकेश वालझडे, किरण मालंजकर , नाक्षिता, अंकित यादव, रोहित, कैवल्य, छाया वराडे, सुनिता पवार, मंदा डोंगरे आदी उपस्थित होते. (Nashik)
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण
गायांनी कारचा पाठलाग करत वासराला वाचवलं, पहा भावनिक व्हिडिओ