Wednesday, December 18, 2024
Homeजुन्नरJunnar : उच्छिल येथे शोभा विज्ञान प्रयोगशाळेचे भव्य उद्‌घाटन संपन्न

Junnar : उच्छिल येथे शोभा विज्ञान प्रयोगशाळेचे भव्य उद्‌घाटन संपन्न

जुन्नर (आनंद कांबळे) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उच्छिल येथे दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमच्या माजी अध्यक्षा व हॅपी स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष स्नेहल चोरडिया यांच्या माध्यमातून शोभा मुथ्या यांच्या दातृत्वातून भव्य विज्ञान प्रयोगशाळेचे उद्‌घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या भव्य सोहळ्याकरीता त्याचे पुत्र व उद्योजक प्रशांत मुथ्था व त्यांच्या पत्नी सुरभी मुथ्या यांच्या विशेष उपस्थितीत झाला. (Junnar)

या सुंदर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध युवा समाज प्रबोधनकार व झी टॉकिज फेम गुरुवर्य ह.भ.प. दर्शन महाराज कबाड्डी व प्रा.डॉ. अभिजित पाटील अधिव्याख्याते व ह्युमन राईटसचे अभ्यासक श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सागर बगाड उपस्थित होते.

सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या वतीने वाजत गाजत व शालेय विद्यार्थ्यांच्या आपल्या इंग्रजी भाषेतून गुलाबपुष्पे देऊन करण्यात आले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नंतर उपस्थित कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेच्या वतीने शोभा मुथ्या प्रयोगशाळेचे उद्‌घाटन संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या संकल्पनेतून काही प्रयोग करून दाखविले व भविष्यात हे साहित्य आमच्याकरीता प्रेरणादायी असल्याचे विद्यार्थ्यांनी मान्यवरांना सांगितले यानंतर त्यांना आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. (Junnar)

या प्रसंगी स्नेहल चोरडिया यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अशा प्रकारची विज्ञान प्रयोगशाळा केल्याने निश्चित भविष्यात या विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, त्यांना विज्ञानाविषयी आवड त्यांच्यात चिकिस्तकवृत्ती निर्माण होण्यास मदत होणार आहे भविष्यात नक्कीच आपले विद्यार्थी संशोधन करण्यासाठी प्रयत्नशील होतील व जिल्हा परिषदेने अशा प्रकारच्या अत्यावश्यक सोयी सुविधा आदिवासी ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे देखील गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यापूर्वकाळात देखील संस्थेच्या माध्यमातून हॅपी स्कूल शालेय विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण व ‘नो चॉक नो डस्ट’ संकल्पना जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये राबविणार असून त्यांना व्हाईट बोर्ड देण्याची कल्पना विचाराधिन असून भविष्यामध्ये जसं शक्य होईल तसं सर्व शाळांमध्ये बोर्ड पुरविणार असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यातील उच्छिलसह, कालदरे, शिवली, हिवरे तर्फे नारायणगाव, शिवेचीवाडी येथे विविध शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले आहे.

विज्ञान प्रयोग शाळेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून आनंदा मांडवे यांच्या विनंतीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोद्रे येथे हॅपी स्कूल राबविण्यात येणार असून तेथील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वितरण सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले असून जुन्नर जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इनामवाडी येथे एक सुसज्ज म्युझिकल कक्ष करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विज्ञान प्रयोगशाळाचे दाते शोभा मुथा व त्यांचा परिवार यांनी देखील आम्ही भविष्यात आदिवासी भागातील व ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता ज्या शैक्षणिक सुविधांची कमतरता असेल व जी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार नाहीत अशा आवश्यक सुविधा भविष्यात आम्ही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन शोभा मुथ्था व त्यांचे परिवार यांनी दिले. (Junnar)

या विज्ञान प्रयोग शाळेसाठी शाळेस शुभेच्छा जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे विस्तार अधिकारी संचिता अभंग केंद्रप्रमुख पुष्पलता पानसरे विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रविण ताजणे रतिलाल बाबेल सरपंच मंगेश आढारी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन नवले यांनी दिल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित हिवरे तर्फे नारायणगाव शाळेचे सयाजीराव चिखले, आदर्श शिक्षक संजय रणदिवे यांनीही शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील नागरिक व समिती सदस्य किसन नवले शांताबाई नवले हिराबाई नवले विमल करवंदे सुरेखा नवले व दिपक ससाणे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष मोहरे यांनी तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन स्मिता ढोबळे आरती मोहरे यांनी व सर्वांचे आभार लिलावती नांगरे यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात

मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

संबंधित लेख

लोकप्रिय