Wednesday, March 12, 2025

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्याची 25 मार्च पासून विशेष मोहीम : कृषिमंत्री दादाजी भुसे

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे राज्यात उत्तम काम सुरु असून 8 लाख 86 हजार शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करण्यासाठी 25 मार्चपासून संपूर्ण राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत केली.

कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले की, केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत असून या योजनेची महसूल, कृषि, ग्रामविकास आणि सहकार या विभागांच्या संयुक्तपणे राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थी शेतकरी कुटुंबांना मिळावा यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांची माहिती अद्ययावत करुन ती पीएम-किसान पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे नोंदणीकृत पात्र लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत असून 15 मार्च 2022 अखेर एकूण 109.33 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 18120.23 कोटींची रक्कम डीबीटीद्वारे जमा करण्यात आली आहे, असेही कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले.

सावधान ! “आसनी” चक्रीवादळ तीव्र होणार, अंदमान निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस

केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी 31 मेपर्यंत मुदत देण्यात आली असून पात्र लाभार्थींना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या चर्चेत सदस्य अभिमन्यू पवार यांचेसह राधाकृष्ण विखे-पाटील, ॲड. राहुल कुल आदींनी भाग घेतला.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles