पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – रावेत येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (PCACS) महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता आणि परीक्षा तयारी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हिंजेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या संधी, योग्य करिअर निवडीच्या परीक्षा तयारीसाठी आवश्यक असलेल्या कार्यक्षम पद्धतीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. (PCMC)
मार्गदर्शन दुर्गेश पुराणिक आणि राजेश पाटील यांनी केले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध करिअर पर्यायांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांचे वैयक्तिक गुण वैशिष्ट्य आणि आवड लक्षात घेऊन योग्य करिअर निवडण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परीक्षा तयारीसाठी कार्यक्षम पद्धती, वेळेचे व्यवस्थापन, तणाव कमी करण्यासाठी टिप्स आणि योग्य अभ्यास पद्धतीवर मार्गदर्शन केले. (PCMC)
कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अ. स. ओतारी आणि ज्युनियर कॉलेजचे संतोष विश्वनाथ मेरूकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडीतील महत्त्व सांगितले.
पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा :
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती
जुन्नर : श्रेयश कदमची राष्ट्रीय हॅण्डबॉल स्पर्धसाठी निवड