Maratha Reservation : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या असून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य करत मराठा समाजाला आश्वासन दिलं आहे. आज महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. आगामी निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांचं मोठं आव्हान महायुतीसमोर असेल, याचा सामना कसा करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे सांगितलं की, “मी जे बोलतो ते करतो. मराठा समाजाला मी स्वतः आरक्षण देणार आहे.”
शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. त्यानंतर तात्काळ विधानसभा अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं गेलं, असं त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत सांगितलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीही मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, परंतु ते कोर्टात टिकवता आलं नाही. तसेच, आता देखील आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे,मात्र ते रद्द करण्यासाठी देखील आटापिटा सुरु आहे,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका करत सांगितलं आहे.
Maratha Reservation
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
राज्यात आज किंवा उद्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता
बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींना अटक, तर फरार आरोपीचा शोध सुरू
आनंदाची बातमी : होमगार्डसाठी राज्य सरकारने दिले दसऱ्याचे मोठे गिफ्ट
महायुती सरकार : महिलांसाठी महायुती सरकारची मोठी घोषणा